यावल तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची सेनेची मागणी
यावल : शहर व परीसरातील तसेच तालुक्यातील खुलेआमपणे सट्टा, पत्ता व गुटखा सुरू असल्याने अनेक जण त्याच्या आहारी जाऊन कुटुंब आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहे. तरुण पिढी व अनेक लोक सट्टा , पत्ता खेळून व त्या नांदी लागून वाम मार्गाला लागत असल्याने पोलिस दखल घ्यावी, अशी मागणी सेनेतर्फे करण्यात आली. शिवाय शहरात व तालुक्यात गुटखा खुलेआम विकला जात असल्याने तरुण पिढीला आजाराची शक्यताही बळाी आहे. शहरासह परीसरात सुरू असलेला सट्टा, पत्ता तसेच गुटखा विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास शिवसेन -युवासेना आंदोलन छेडेल, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे. निवेदनाची प्रत आमदार लता सोनवणे यांनाही पाठवण्यात आली आहे.
निवेदन देताना यांची उपस्थिती
निवेदन देताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार साडूसिंग पाटील, जिल्हा संघटक दीपक रामचंद्र बेहडे, रवींद्र पोलाद सोनवणे, जगदीश खडीवाले, कडू पाटील, सुरेखा कोळी, भानुदास दगडू चोपडे, गोपाल लोटन चौधरी, परवीन तुकाराम सोनवणे, बारसिंग तेरसिंग बारेला, हुसेन जागीर तडवी, सुनील बासुदेव बारी, सागर अशोक देवांगन, शरद कोळी, पप्पू जोशी, विनायक पाटील, योगेश पाटील, धनराज पाटील, महेंद्र माळी, रोहिदास महाजन, प्रकाश कोळी, संतोष खाडे, मोहसीन खान, सागर बोरसे, अजहर खाटीक, परचीन बडगुजर, सिद्धी कच्ची व सर्व शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.

