शिवसेनेच्या मोर्चाने दणाणले भुसावळ शहर
भुसावळ तहसीलदारांनी स्वीकारले निवेदन : अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने भरपाईची मागणी
भुसावळ : अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाई पोटी जिराईती जमिनीसाठी आर्थिक मोबदला मिळावा, शेतकर्यांसाठी दिवसा वीज मिळावी, वन्य प्राण्यापासून शेतरक्यांच्या पिकांचे संरक्षण व त्यापासून झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासह विविध मागण्यांसाठी भुसावळ तहसील कार्यालयावर सोमवारी सकाळी शिवसेनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी मोर्चेकर्यांनी तहसील आवारात जोरदार घोषणाबाजी केली. प्रसंगी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या मागण्यांसाठी मोर्चा
लहान धरणांच्या बॅक वॉटरमुळे शेतकर्यांच्या शेतातील पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई करावी, शेतकर्यांंच्या शेतातील भाजीपाला व अन्य पिकांना हमी भाव मिळावा, तरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त आणि लवकर मदत मिळाव, बागायतीचा हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरावल्याने शेतकर्यांचे 100 टक्के नुकसान झाले आहे तर नुकसान झालेल्या शेतकर्यांना घोषीत करण्यात आलेली मदत ही पुरेशी नसल्याने ही मदत ती वाढवून हेक्टरी कमीत कमी 25 हजार रुपये आणि बागायतीसाठी 500 हजाररुपये हेक्टरी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे
यांचा होता मोर्चात सहभाग
शहरातील वसंत टॉकीज जवळील महाराणा प्रताप चौकापासून तहसील कार्यालयापर्यत मोर्चो निघाला. भुसावळ तालुका शिवसेना, महिला आघाडी सेना, युवा सेना, ग्राहक संरक्षण, आघाडी शिक्षक सेना, अल्पसंख्याक आघाडी, एसटी कामगार सेना, रेल कामगार सेनेचे पदाधिकारी मोर्चात सामील झाले. मोर्चात शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन, विलास मुळे, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, शहराध्यक्ष बबलू बर्हाटे,निलेश महाजन, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष प्रा.विनोद गायकवाड, शिवसेना उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, देवेंद्र पाटील, राकेश खरारे, नामदेव बर्हाटे, गौतम तायडे विकास खडके, कैलास जाधव, सुधाकर शिनगारे, लखन सोनवणे आदी उपस्थित होते.

