खंडवा रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणी : दोन लाखांचा दंड वसुल


भुसावळ : खंडवा रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या विशेष तपासणी पथकाने सोमवारी धडक मोहिम राबवत 358 प्रवाशांकडून एक लाख 96 हजार 850 रुपयांचा दंड वसुल केला. या मोहिमेमुळे फुकट्या प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबधंक आर.के.शर्मा व सहाय्यक वाणिज्य प्रबधंक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या मोहिमेत 28 तिकीट निरीक्षकांसह सात रेल्वे सुरक्षा बल कर्मचार्‍यांनी विना तिकीट प्रवास करणार्‍या 79 प्रवाशांकडून 56 हजार 580 रुपयांचा दंड वसुल केला तर रीझर्व्ह डब्यातून जनरल तिकीटावर प्रवास करणार्‍या 279 प्रवाशांकडून तब्बल एक लाख 40 हजार 270 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. या मोहिमेत तपासणी विभागाचे मुख्य तिकीट निरीक्षक वाय.डी.पाठक यांच्यासह विविध विभागाचे तिकीट तपासणीस उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !