तळोदा पोलिस ठाण्यातील लाचखोर हवालदार जाळ्यात


नंदुरबार एसीबीची कारवाई ; पोलिस दलात खळबळ

तळोदा : मारहाणीच्या प्रकरणात वाद मिटवण्यासाठी 20 हजारांची लाच मागणार्‍या तळोदा पोलिस ठाण्यातील हवालदार दशरथ राजाराम चव्हाण यांना नंदुरबार एसीबीच्या पथकाने अटक केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. दशरथ राजाराम चव्हाण असे अटकेतील हवालदाराचे नाव आहे.

मध्यस्थीसाठी मागितली लाच
तक्रारदाराच्या प्लॉटवर एकाने अतिक्रमण केल्यानंतर तक्रारदाराने हटकल्यानंतर अतिक्रमण धारकानेच दमदाटी केल्याने याबाबतचा तक्रार अर्ज पोलिस ठाण्यात देण्यात आल्यानंतर आरोपी हवालदार दशरथ चव्हाण यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली होती शिवाय यापोटी तक्रारदाराकडे 11 जुलै रोजी 25 हजार रुपये तडजोडीपोटी मागितले होते तर 20 हजारात तडजोड झाल्यानंतर लाचेची रक्कम नंतर नातेवाईकांकडून स्वीकारेल, असे सांगत त्यावेळी लाच स्वीकारली नव्हती मात्र पंचांसमक्ष लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने सोमवारी हवालदारास अटक करण्यात आली. ही कारवाई नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.


कॉपी करू नका.