भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे निधन
जळगाव : भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अमळनेर येथे निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर रुग्णालयातच त्यांचे निधन झाले.
अंघोळ करताना हृदयविकाराचा झटका
उदय वाघ हे गुरुवारी सकाळी 10 वाजता अंघोळीला गेले असता 20 मिनिटे होवूनही बाहेर न आल्याने मुलगी भैरवीने आवाज दिल्यानंतरही त्यांनी प्रतिसाद दिल्याने दरवाजा तोडण्यात आला व वाघ यांना डॉ.निखिल बहुगुणे यांच्या दवाखान्यात हलविल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. कुटुंबीय, नातेवाईक आणि भाजपसह सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकार्यांनी रुग्णालयात व त्यांच्या घरी गर्दी केली होती. वाघ यांच्या पश्चात पत्नी आमदार स्मिता वाघ, दोन मुली, जावई असा परीवार आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जळगावातील कार्यालयावर समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे.


