डांभूर्णीतील इसमाची नैराश्यातून आत्महत्या
यावल : तालुक्यातील डांभुर्णी येथील रहिवासी विनोद प्रकाश भील (42) यांनी नैराश्येतून गावानजीकच्या एका शेतामध्ये आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार, 28 रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. या घटनेने डांभूर्णीत खळबळ उडाली आहे. मृत विनोद यांना तीन मुली व एक मुलगा असून दोन मुलींचे लग्न झालेले आहे. पत्नी त्यांच्यासेाबत राहत नसल्याने मुलांची होणारी हेळसांडपाहता त्यांनी नैराश्येतूनआत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मयताचा भाऊ रवींद्र प्रकाश भिल्ल यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार जितेंद्र खैरनार करीत आहेत. मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

