शासकीय-निम शासकीय कार्यालयांना संत जगनाडे महाराजांची प्रतिमा भेट
मुक्ताईनगर : शहरातील तेली समाज बांधवांनी तहसील कार्यालय, नगर पंचायत, पोलिस स्टेशन, दुय्यम निबंधक, भूमी अभिलेख, पंचायत समिती, सिंचन विभाग, वन विभाग, विद्युत विभाग, उप जिल्हा रुग्णालयाला संत संताजी जगनाडे महराजांची प्रतिमा भेट स्वरूपात दिली.
जयंतीचे औचित्य साधत प्रतिमा भेट
तेली समाजाचे संत जगनाडे महाराज यांची 8 डिसेंबरला जयंती असून ही जयंती शाळा, शासकीय कार्यालयांमध्ये साजरी करावी,यासाठी मुक्ताईनगरातील तेली समाज बांधवांनी माजी सरपंच रमेश देवचंद सापधरे, प्रकाश बाबूराव खेवलकर, राजेंद्र गोविंदराव सापधरे यांनी उपलब्ध करून दिलेल्या संतांची प्रतिमा शासकीय कार्यालये आणि शाळांना भेट देण्यात आली. त्या प्रसंगी तेली समाज मुक्ताईनगर अध्यक्ष विठ्ठल तळेले, बबलू सापधरे, सुरेश मंडवाले, संतोष सापधरे, गजानन मालगे, संतोष जावरे, विजय सापधरे, शंकर बोराखडे, शशिकांत गलवाडे, सुभाष दैवे व असंख्य समाजबांधव उपस्थित होते.

