जळगावातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू
खून की अपघात ? विविध तर्कवितर्कांना उधाण
जळगाव : शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा शुक्रवारी सकाळी मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली. दरम्यान, या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाला की अन्य कारणाने मृत्यू झाला याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. शरद विठ्ठल कोळी (31 रा.रामपेठ, जुने जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. औद्योगिक वसाहतीमधील पॅराडाईज कंझुमर प्रॉडक्ट या कंपनीसमोर या तरुणाचा मृतदेह आढळला असून अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची चर्चा आहे तर अपघातामुळे त्याचा मृत्यू ओढवला असावा? अशीदेखील शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे यांनी पंचनामा केला. पोलिसांकडून नेमक्या कारणांचा शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

