Speeding Truck Collides With Two Wheeler : Father And Son Injured In Janwe भरधाव ट्रकची दुचाकीला धडक : जानवेतील पिता-पुत्र जखमी


Speeding Truck Collides With Two Wheeler : Father And Son Injured In Janwe अमळनेर : भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत पिता-पुत्र गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आर.के.नगराजवळ घडला. या अपघातात कैलास नंदलाल पाटील (जानवे) यांच्यासह त्यांचा चार वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. जखमींना धुळ्यातील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारार्थ हलवण्यात आले आहे.

धुळ्याचा केतन सोानार ठरला देवदूत
अमळनेर तालुक्यातील जानवे येथील कैलास नंदलाल पाटील हे आपल्या चार वर्षांच्या मुलाला घेऊन अमळनेरकडे दुचाकीने येत असताना सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास अमळनेरहून धुळ्याकडे जाणार्‍या ट्रकने ओव्हरटेक करताना दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात कैलास पाटील आणि त्यांचा चार वर्षीय चिमुकला जबर जखमी झाला. अपघात झाल्यानंतर येथून जाणार्‍या धुळे येथील केतन सोनार या तरुणाने आपल्या चारचाकीतून जखमी पिता-पूत्राला रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताला कारणीभूत असलेल्या वाहनाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

बोदवडमध्ये सुरक्षा रक्षकांचा अभाव चोरट्यांच्या पथ्यावर




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !