अंगणात पाणी आल्याच्या कारणावरून कुर्हेपानाचेत चौघांना मारहाण
Four people were beaten up in Kurhepanache due to water coming into the yard भुसावळ : तालुक्यातील कुर्हेपानाचे येथे रस्त्यावरील पाणी अंगणात येत असल्याच्या कारणावरून सोमवारी रात्री नऊ वाजता झालेला शाब्दीक वाद विकोपाला गेल्याने चौघांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी चौघांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघा संशयीतांविरोधात गुन्हा
या प्रकरणी सुनील सुभाष पारधी (32, इंदिरानगर, कुर्हेपानाचे) यांच्या फिर्यादीवरून देविदास चंद्रकांत सपकाळे, शुभम देविदास सपकाळे, भैय्या कमलाकर सपकाळे, धनराज कोळी (सर्व रा.कुर्हेपानाचे) यांच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी रात्री संशयीत आरोपींनी फिर्यादी सुनील पारधी यांच्यासह त्यांचे भाऊ व वहिनी यांना शिविगाळ करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच आरोपी धनराज कोळी याने फिर्यादी यांच्या आईच्या डोक्यात काठी मारून दुखापत केली. तपास हवालदार युनूस मुसा शेख करीत आहेत.

अल्पवयीन तरुणीचा भुसावळात विनयभंग : फुलगावच्या दोघा आरोपींना अटक

