भुसावळात आरपीएफ सुरक्षा संमेलन


भुसावळ : शहरातील आरपीएफ बॅरेकमध्ये गुरूवारी सकाळी 9.30 वाजता सुरक्षा संमेलनाचे आयोजन करण्यात आले. भुसावळ विभागातील आरपीएफ अधिकारी व बॅरेकमधील जवान यांच्यासाठी झालेल्या संमेलनात रेल्वे सुरक्षा बलाचे महानिरीक्षक अतुल पाठक यांनी मार्गदर्शन केले. रेल्वे स्थानकावर एखादा आरपीएफ जवान गणवेशात फिरतो त्यावेळी प्रवाशांच्या त्याच्याकडून अनेक अपेक्षा असतात, यासाठी प्रवाशांना समजून घ्या, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, अश्या सूचना पाठक यांनी प्रसंगी केल्या.

सर्वसामान्यांना आरपीएफचा मोठा दिलासा
महानिरीक्षक पाठक म्हणाले की, रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी हे बाहेरगावचे असून अनेक जण परप्रांतीय असतात, त्यांना काहीही माहिती नसते. त्यामुळे त्यांनी विचारलेली माहिती त्यांना व्यवस्थित सांगावी, सर्व सामान्य प्रवाशांना आरपीएफ दिसला तर फार मोठा आधार होत असतो. आरपीएफ जवानांनी कर्तव्यासोबतच आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, दररोज रनिंग करावी, व्यायाम करावा, योगा करावा, अश्या सूचना पाठक यांनी दिल्यात. दुपारी चारनंतरही अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली, तर रात्री आयुक्त कार्यालयास भेट देऊन यावेळी विभागातील क्राईमची माहिती जाणून घेतली. सुरक्षा संम्मेलनास डीआरएम विवेककुमार गुप्ता, आर्मीचे कर्नल पुरी यांचीही विशेष उपस्थिती होती. सूत्रसंचालन वरीष्ठ आयुक्त अजय दुबे यांनी केले. यावेळी सहायक आयुक्त राजेश दीक्षित, सहायक आयुक्त दिलीप चौकीकर आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !