Suicide of a youth in Samata Nagar समता नगरातील तरुणाची आत्महत्या
Suicide of a youth in Samata Nagar जळगाव : शहरातील समता नगरातील भरत रमेश आंबेकर (40, रा.समता नगर, जळगाव) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी 28 जुलै रोजी दुपारी तीन वाजता उघडकीस आली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
राहत्या घरात केली आत्महत्या
भरत आंबेकर हा पत्नी सविताबाई व दोन मुलांसह वास्तव्यास होता. हातमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करीत असताना गुरूवारी, 28 जुलै रोजी भरतची पत्नी सविताबाई या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या तर दोन्ही मुले शाळेत गेले होते. त्यामुळे भरत घरी एकटा असताना दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

रामानंद नगर पोलिसात नोंद
आत्महत्या केल्याची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी सविताबाई आणि कल्पेश व किरण हे दोन मुले आहेत.
बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याच्या धमकीने तरुणाची आत्महत्या : अडावदच्या सहा जणांविरोधात गुन्हा

