भुसावळातील तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीद्वारे प्लॉट विक्री प्रकरण : श्री जनकल्याण अर्बन क्रेडिट पतसंस्थेचा पसार वसुली अधिकारी जाळ्यात
Plot sale case through fake signature of Tehsildar in Bhusawal: Janurban’s expansion in collection officer’s net भुसावळ : भुसावळातील श्री जनकल्याण अर्बन क्रेडिट पतसंस्थेचा विशेष वसुली अधिकारी रवींद्र धांडे यास गुरुवारी गोपनीय माहितीच्या आधारे अटक करण्यात आली. आरोपीच्या अटकेने या गुन्ह्यातील अनेक चेहरे समोर येणार आहेत. आरोपीला गुरुवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता शनिवार, 30 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
बनावट आदेशानंतर प्लॉटची विक्री
आरोपी भोळेने तहसीलदारांचा बनावट आदेश व तहसील कार्यालयातील शिक्का तयार करून त्या आदेशाच्या 22 डिसेंबर 2021 या दिवसाच्या आदेशाचे पत्र तयार करीत 10 जणांना प्लॉटची विक्री केल्याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या खरेदी विक्रीची नोंद सहायक निबंधक खरेदी विक्री कार्यालयात 16 मे 2022 रोजी करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहेत.


