शिक्षक घोटाळा प्रकरण : अर्पिता मुखर्जीच्या घरातून 20 कोटींच्या रोकडसह कोट्यवधींचे सोने जप्त


Teacher Scam Case: Arpita Mukherjee’s house with Rs 20 crore cash and crores worth of gold seized नवी दिल्ली :  सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने बुधवारी केलेल्या छापेमारीमध्ये 20 कोटी रुपये रोकड, सोन्याचे दागिने, सोन्याच्या विटा, संपत्तीसंदर्भातील करारपत्रे अशा अनेक गोष्टी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय असणार्‍या अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून जप्त केल्या आहेत. आतापर्यंत 29 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील शिक्षक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंत ईडीने भ्रष्टाचाराविषयी मंत्री पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांची कसून चौकशी सुरू आहे.

छापेमारीत कोट्यवधींची संपत्ती जप्त
शिक्षक घोटाळ्याप्रकरणी झालेल्या भ्रष्टाचाराच्या माहितीवरुन चॅटर्जी आणि मुखर्जी यांच्या संपत्तीची तपासणी ईडीकडून घेतली जात आहे. एसएससी घोटाळा झाला तेव्हा सध्या ईडीने अटक केलेले मंत्री पार्थ चटर्जी शिक्षणमंत्री होते. कोलकात्याजवळच्या बेलघराई शहरातील घरावर केलेल्या छापेमारीमध्ये ही संपत्ती ईडीने जप्त केली आहे.

नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन्स
मागील आठवड्यामध्येच अर्पिता यांच्या डायमंड सिटी कॉम्पलेक्स येथील घरावरील छापेमारीमध्ये 20 कोटी रोकड सापडली होती. या रकमेचा पंचनामा करण्यासाठी कोलकात्यामधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयामधून नोटा मोजण्याच्या मशिन्स मागवण्यात आल्या होत्या. तसेच या चौकशीत सापडलेल्या सोन्याच्या विटांची किंमत ही दोन कोटींहून अधिक आहे. तपासामध्ये अधिक संपत्ती सापडण्याची शक्यता ईडीकडून व्यक्त केली जात आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !