चाळीसगाव तालुक्यातील तरुण तरसोद फाट्याजवळ अपघातात ठार

तरसोद फाट्याजवळील घटना ; नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद


A youth from Chalisgaon taluka was killed in an Accident near Tarsod Phata जळगाव : तरसोद फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत चाळीसगाव तालुक्यातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री घडला. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हरीओम धनाजी पाटील (38, न्यायडोंगरी, ता.चाळीसगाव, ह.मु. श्रध्दा कॉलनी, गोदावरी चक्कीजवळ, जळगाव) असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

अज्ञात वाहनाचा पोलिसांकडून शोध
हरीओम पाटील हा आईवडीलांसह वास्तव्याला आहे. बांधकामाचे साहित्य पुरविण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. हरीओम पाटील हा गुरूवार 28 जुलै रेाजी रात्री 10 वाजेच्या सुमारास कामानिमित्त जळगावहून नशिराबाद कडे दुचाकीने जात होता. त्यावेळी अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हरीओमचा जागीच मृत्यू झाला. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर वाहतूकीची कोंडी झाली होती. नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून वाहतूक सुरळीत केली.

नशिराबाद पोलिसात नोंद
मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. शुक्रवारी 29 जुलै रोजी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई दगूबाई, वडील धनाजी पाटील आणि दोन विवाहित बहिणी असा परीवार आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !