23 वर्षीय तरुणीची विषारी औषध सेवन करीत मृत्यूस कवटाळले


A 23-year-old girl died after consuming poisonous medicine जळगाव : जिल्ह्यातील धानवड येथील 23 वर्षीय तरुणीने विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. दुर्गा पुरूषोत्तम वाघ (23, धानवड, ता.जि.जळगाव) असे मृत तरुणीचे नाव आहे.

घरात कुणी नसताना उचलले टोकाचे पाऊल
दुर्गा वाघ ही तरूणी आपल्या कुटुंबियासह जळगाव तालुक्यातील धानवड येथे वास्तव्याला होती. घरी कुणीही नसतांना तरूणीने राहत्या घरात विषारी औषध घेतले. दरम्यान, हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर तिला तातडीने जळगावातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !