कंपनीचे बनावट फॉर्म तयार करीत हेराफेरी : गोदाम किपरने घातला कंपनी मालकाला 45 लाखांचा गंडा


Manipulation by creating fake company forms: Warehouse keeper cheated company owner of 45 lakhs जळगाव : गोदाम किपरने मालकाला तब्बल 45 लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील एमआयडीसी येथील विजय ग्रो सेंटर या कंपनी मालकाची फसवणूक झाल्याची बाब समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील पिंप्राळा परीसरातील निसर्ग कॉलनी येथील रहिवासी नितीन जगदीश कुलकर्णी (42) यांची एमआयडीसी येथील 32 एक्स सेक्टरमध्ये विजय ग्रो सेंटर नावाने कंपनी आहे. कंपनीतील गोडावून किपर पंकज नितीन पाटील (जगवानी नगर, जळगाव) याने जून 2021 ते 29 एप्रिल 2022 दरम्यान कंपनीचे बनावट फॉर्म तयार करुन 44 लाख, 73 हजार 628 रुपये किंमतीच्या विविध विद्राव्य खते, बियाणे तसेच किटकनाशके या मालाचा अपहार केला. हा प्रकार समोर आल्यानंतर कंपनी मालक नितीन कुळकर्णी यांनी पंकज नितीन पाटील यांच्या विरोधात सोमवार, 1 ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !