The youth was beaten up by three people in anger for asking him to Come To The House रामेश्वर कॉलनीत किरकोळ कारणावरून तरूणाला मारहाण
A young man was beaten for a minor reason in Rameshwar Colony जळगाव : घरात येण्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तीन जणांनी तरुणाला शिवीगाळ करीत दगड मारून दुखापत केली. ही घटना रामेश्वर कॉलनीत घडली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
डोक्यात दगड मारून केली दुखापत
संदीप हरी पाटील (21, रा.प्रियंका किराणा दुकानाजवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव) हा तरुण वास्तव्याला आहे. त्याच्या घराच्या शेजारी प्रतीक अशोक पांडूळे हा राहतो. रविवार, 31 जुलै रोजी रात्री प्रतीक हा संदीप पाटीलच्या घरी आला असता घरी येण्याचे कारण संदीपने विचारल्याने प्रतिकला राग आला. प्रतिकसह त्याची आई व वडील या तिघांनी मिळून संदीप पाटील याला शिवीगाळ करून मारहाण केली. प्रतीकने हातातील दगड डोक्यात मारून दुखापत केली.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा
याबाबत संदीप पाटील याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने सोमवारी रात्री उशीरा प्रतीक अशोक पांडूळे याच्यासह त्याची आई व वडील या तिघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.
