वृद्ध शेतकर्‍याने गळफास घेत संपवले जीवन : शिंदाड गावात पसरली शोककळा


A farmer of Shindad committed suicide by hanging himself पाचोरा : तालुक्यातील शिंदाड येथील 60 वर्षीय वृद्ध शेतकर्‍याने शेतातील झाडास गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. दयाराम नारायण चौधरी (60) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
शिंदाड, ता.पाचोरा येथील ग्रामपंचायत सदस्य व समाज विकास शिक्षण मंडळाचे संचालक दयाराम नारायण चौधरी (60) यांनी मंगळवार, 2 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास गावातीलच उत्तम महादु चौधरी यांच्या शेतातील झाडास गळफास लावत आपली जीवनयात्रा संपवली. दयाराम चौधरी यांना ग्रामस्थांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. दयाराम चौधरी यांच्या आत्महत्ये मागील कारण समजु शकले नाही. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत दयाराम चौधरी यांच्या पश्चात्य पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !