रजेवर कैदी बाहेर आला मात्र कारागृहात जाण्यापूर्वीच पसार झाला
Prisoners in Jalgaon Escape As Soon as Abhiwachan Comes On Leave : Crime In City Police जळगाव : शहरातील शिवाजीनगर परीसरातील आरोपी हा पैठण कारागृहात असताना अभिवचन रजेवर बाहेर आला मात्र अभिवचन रजेचा कालावधी संपूनही पुन्हा कारागृहात न परतल्याने त्याच्याविरोधात ळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शेख ईसा शेख पीरन (शिवाजी नगर, जळगाव)असे पवार आरोपीचे नाव आहे.
रजेवर येताच आरोपी पसार
शवाजीनगर येथील आरोपी शेख ईसा शेख पीरण हा एका गुन्ह्यात पैठण कारागृहात होता. कोरोना काळात त्यास रजेवर त्यास बाहेर सोडण्यात आले . मात्र अभिवचन रजा संपूनही तो पुन्हा कारागृहात परतला नाही. अनेक दिवस उलटूनही आरोपी परत न आल्याने सोमवारी, पैठण कारागृहाचे कर्मचारी रवींद्र नथ्थू बागुल यांनी जळगाव शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय निकुंभ हे करीत आहेत.

