अद्रक विक्रेत्याची गणेशपूरच्या व्यापार्‍याने केली फसवणूक : अखेर पोलिसात गुन्हा


A trader cheated a farmer of Shindi by 85 thousand for buying ginger चाळीसगाव : तालुक्यातील शिंदी येथील शेतकर्‍यांकडून एका व्यापार्‍याने 31 क्विंटल अद्रकाची खरेदी करीत 85 हजारात फसवणूक केली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात व्यापारीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

फसवणूक प्रकरणी अखेर गुन्हा
तालुक्यातील शिंदी येथील शेतकरी प्रदीप पांडुरंग अगोणे (43) हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास आहे. शेती व्यवसाय करून अगोणे आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवित असतो. दरम्यान अगोणे यांना गेल्या वर्षी शेतीतून 31 क्विंटल आद्रक निघाली. त्यावर 20 जूलै 2020 रोजी अरूण अशोक कुलकर्णी रा. गणेशपुर ता. चाळीसगाव नामक व्यापार्‍यांनी अगोणेकडून चार हजार रुपये प्रति क्विंटल दराने आद्रकाची खरेदी केली. एकूण एक लाख 24 हजार रुपयांपैकी कुलकर्णी यांनी संबंधित शेतकर्‍याला 39 हजार रुपये रोकड देऊन उर्वरित 85 हजार रुपये नंतर देण्यात येईल असे सांगितले. मात्र संबंधित शेतकर्‍यांनी वारंवार व्यापार्‍यांकडे पैशाची मागणी केली. परंतु वर्ष उलटला तरीही पैसे देण्यास त्याच्याकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे सदर व्यापारी नामे कुलकर्णी यांनी आपली फसवणूक केली. हे स्पष्ट झाल्यावर अगोणे यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानक गाठून तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एपीआय धरमसिंग सुंदरडे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास हवालदार ओंकार सुतार हे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !