टाटा एआयजी खान्देश रन मॅरेथॉन स्पर्धेत भुसावळच्या 85 रनर्सचा सहभाग


भुसावळ : जळगाव येथे झालेल्या टाटा एआयजी खान्देश रन 2019 या मॅरेथॉन स्पर्धेत भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या 85 धावपटूंनी सहभाग नोंदवला. त्यापैकी 25 धावपटू अर्ध मॅरेथॉन अर्थात 21 किलोमीटर, 50 धावपटू 10 किलोमीटर, सहा धावपटूंनी 5 किलोमीटर तर चार धावपटूंनी तीन किलोमीटरच्या श्रेणीत सहभाग नोंदवला. पंढरीनाथ चौधरी यांनी दहा किलोमीटरच्या स्पर्धेत (वय 41 ते 99) या श्रेणीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. डॉ.चारुलता पाटील यांनी महिलांच्या 21 किलोमीटरच्या स्पर्धेत (वयोगट 41 ते 99) या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. या शिवाय तरुण बिरीया यांनी 21 किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन केवळ एक तास 57 मिनिटात पूर्ण करून (ज्याला स्पर्धेत सब 2 असे म्हटले जाते) एक आगळावेगळा विक्रम नोंदवला. प्रवीण फालक व डॉ.तुषार पाटील यांनी 21 किलोमीटरच्या स्पर्धेत पेसर्स म्हणून तर प्रवीण पाटील व प्रदीप सोलंकी यांनी 10 किलोमीटरच्या स्पर्धेत पेसर्स म्हणून काम बघितले. या कामगिरी बद्दल सर्व धावपटूंचे भुसावळ शहरातील मान्यवर व सामान्य नागरीकांनी अभिनंदन केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !