Forced Robbery By Beating A Young Man : Incident In Jalgaon तरुणाला मारहाण करीत केली लूट : दोघांविरोधात गुन्हा


Forced Robbery By Beating A Young Man : Incident In Jalgaon जळगाव : तरुणाला रस्त्यात अडवत दोन जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली व तक्रारदाराच्या खिशातील बाराशे रूपयांची रोकड लांबवण्यात आली. ही घटना गेंदालाल मिल परीसरात घडली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गेंदालाल मिल परीसरात लुटले
अल्ताफ शेख सलीम (28, रा.सुरेशदादा जैन नगर, गेंदलाल मिल, जळगाव) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवार, 2 ऑगस्ट रोजी सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास अल्ताफ शेख हा शहरातील गेंदालाल मिल परिसरातील सिटी कॉलनी जवळून पायी जात असताना रस्त्यावर मुसेफ शेख आणि रईस समशेर पठाण (दोन्ही रा.गेंदालाल मिल) यांनी त्याचा रस्ता अडविला. काहीही कारण नसतांना शिविगाळ करून दमदाटी केली आणि त्याच्या खिशातून बाराशे रुपयांची रोकड बळजबरी घेत पळ काढला. याबाबत अल्ताफ शेख सलीम याने जळगाव शहर पोलीस ठाण्यात घेऊन तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रारीवरून रात्री 11 वाजता शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मुसेफ शेख आणि रईस समशेर पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर ठाकरे करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !