घरफोडीत तरबेज अट्टल चोरटे एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


Burglary in Master Colony: Attal thieves in MIDC Police Net जळगाव : अट्टल घरफोडे एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. इश्तीयाक अली राजीक अली (19), सलीम उर्फ सल्या शेख कय्यूब (26, दोन्ही रा.तांबापुरा) आणि सरजील सैय्यद हरून सैय्यद (26, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

घरफोडी प्रकरणी अटक
जळगाव शहरातील मास्टर कॉलनी येथे बंद घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना बुधवार, 3 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता मास्टर कॉलनी आणि तांबापुरा परिसरातून अटक करण्यात आली.

एमआयडीसी पोलिसात दाखल होता गुन्हा
जळगावच्या मास्टर कॉलनीतील मेहरुन्नीसा शेख नियाजोद्दीन (वय-56) रा. जमजम किराणानगर जवळ, मास्टर कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. 28 जुलै रोजी सकाळी त्यांचा मुलगा आणि सून हे कामाच्या निमित्ताने नगरदेवळा गावाला गेले होते. त्यामुळे मेहरुन्नीसा ह्या शेजारी राहणार्‍या पुतण्याकडे रात्री झोपण्यासाठी गेल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत बंद घर फोडून घरातील 20 हजार रुपयांची रोकड, सोन्याचे कानातील टॉप्स, सोन्याचे मंगळपोत असा एकूण 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. या संदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय माहितीवरून कारवाई
या गुन्ह्यातील संशयीत आरोपी हे तांबापुरा आणि मास्टर कॉलनीत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सहायक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, पोलीस नाईक, सुधीर सावळे, इमरान सैय्यद, मुदस्सर काझी, जमीर शेख, सचिन पाटील, साईनाथ मुंडे यांनी कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तपास हवालदार रामकृष्ण पाटील, सचिन पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !