भुसावळचे माजी नगरसेवक संतोष बारसे यांना अपिलात दिलासा
हद्दपारीचा कालावधी वर्षभरावरून सहा महिने : शहरात परतण्याचा मार्ग मोकळा
भुसावळ : भुसावळचे माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी 17 मे 2019 रोजी त्यांना जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले होते. हद्दपारीच्या आदेशाविरुद्ध बारसे यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपिल दाखल केले होते. दरम्यानच्या काळात अपिलात सुनावणी झाल्यानंतर नाशिक विभागीय आयुक्तांनी बारसे यांच्या एक वर्षाच्या हद्दपारीचा कालावधी सहा महिने केल्याने त्यांचा भुसावळात येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या वृत्ताला बारसे यांनी दुजोरा दिला आहे. याबाबत 15 नोव्हेंबर रोजी तहसीलदार, सामान्य प्रशासन विभागीय आयुक्त नाशिक यांनी आदेश काढले असून बाजारपेठ पोलिसांना आदेशाची प्रत पाठवण्यात आली आहे.
