वृद्धाचा मृतदेह आढळला
The body of an unknown old man was found near Vidgaon जळगाव : तालुक्यातील विदगाव परिसरात एक बेवारसरीत्या वृद्धाचा मृतदेह आढळला. जळगाव तालुका पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. याबाबत बुधवार, 3 ऑगस्ट रोजी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.
ओळख पटवण्याचे आवाहन
जळगाव तालुक्यातील विदगाव येथे मंगळवार, 2 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास एका अंदाजे 70 वर्षीय अंदाजे मृतदेह बेवारसरीत्या आढळून आला. विदगाव येथील ग्रामस्थांनी तातडीने जळगाव तालुका पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाचा पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. दरम्यान पोलिसांनी मयताची ओळख पाठवावी असे आवाहन जळगाव तालुका पोलीसांनी केले आहे. याबाबत बुधवार, 3 ऑगस्ट रोजी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नजन पाटील करीत आहे.

