20 वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या


The young man ended his life by hanging himself in Supreme Colony जळगाव : शहरातील 20 वर्षीय तरुणाने घरात गळफास घेतल्याची घटना सुप्रीम कॉलनीत घडली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सलमान खान गफार खान (20, पोलिस कॉलनी, सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे मयताचे तरुणाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
गुरुवारी रात्री तरुण जेवण करून झोपला मात्र मध्यरात्री त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शुक्रवार, 5 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.पोलिसांनी मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी हलवला व शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !