शिंगाडीत एकाचा पाण्यात बुडून मृत्यू
निंभोरा बु.॥ : जवळच असलेल्या शिंगाडी येथील ज्ञानेश्वर रमेश पाटील (23, शिंगाडी) या युवकाचा बुधवार, 27 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7.30 ते 30 नोव्हेंबरच्या सकाळी 9.30 वाजेदरम्यान (वेळ नक्की नाही) शिंगाडी तापी नदीच्या बॅकवॉटरच्या पाण्यात बुडाल्याने मृत्यू णाला. याबाबत पोलिस पाटील संजय चुडामण कांडेलकर यांनी निंभोरा पोलिस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, यांच्या मार्गदर्शनखाली फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे तसेच निंभोरा फौजदार शिंदे, सहाय्यक फौजदार भास्कर कुलकर्णी करीत आहेत.

