उभ्या कंटेनरला धडक : दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
जळगाव : उभ्या कंटेनरवर दुचाकी जोरदार धडकल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री भुसावळ रस्त्यावरील हॉटेल त्रिमुर्तीजवळ घडला. हरेश्वर गोपाळ चौधरी (55, रा. भादली, ता.जि.जळगाव) असे मृत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.
कामावरून घरी जाताना गाठले मृत्यूने
जळगाव तालुक्यातील भादली येथील रहीवासी हरेश्वर चौधरी हे पत्नी, मुलगा आणि मुलीसह वास्तव्याला आहे. जळगाव एमआयडीसीतील एका बॉयलर कंपनीत कामाला आहे. आज शुक्रवार, ५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता कामावरून घरी जाण्यासाठी दुचाकी (एमएच १९ बीएल २८९९) ने निघाले असता जळगाव-भुसावळ महामार्गावरील हॉटेल त्रिमुर्ती जवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या उभ्या कंटेनर (एचआर ३८ ए ७२२२) ला जोरधार धडक दिली. या अपघातात हरेश्वर चौधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातस्थळी पोलिसांची धाव
घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांनी धाव घेवून मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी मालतीबाई, मुलगा वैभव आणि विवाहित मुलगी सुवर्णा असा परिवार आहे.
