निष्पापावर अन्याय होणार नाही मात्र खर्या आरोपीवर कारवाई होणारच
रावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे उटखेड्याच्या महिलांना आश्वासन
रावेर : तपासात सहकार्य करा, आरोपीची माहिती असल्यास आम्हाला गोपनीय पद्धत्तीने कळवा, निष्पाप व्यक्तीवर आमच्याकडून केव्हाच अन्याय होणार नाही, थोडा धीर धरा, उटखेडा येथील गुन्हा गुंतागुंतीचा झाल्याने आम्ही योग्य व खात्री करूनच खर्या आरोपीला निश्चित शोधू, असे आश्वासन रावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी उटखेडा येथील महिलांना दिले.
ग्रामस्थांच्या सहकार्याशिवाय आरोपी गवसणार कसा? निरीक्षकांचा सवाल
उटखेडा येथील महिले प्रकरण अश्लील संभाषण व विनयभंगामुळे संपूर्ण तालुक्यात चर्चेले जात आहेत. खर्या आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. यासाठी पोलिसांकडून तपासासाठी उटखेडा गावातील काही युवकांना चौकशीसाठी बोलविले जात आहे. याचा राग घेऊन या युवकांच्या आई, बहिण व इतर महिला नातलक रावेर पोलिस ठाण्यात धडकत असून आमच्या मुलांना नाहक त्रास देऊ नका, आमची मुले शिक्षण घेत असून त्यांना येथे चौकशीसाठी आणू नका, असे आवाहन पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्याकडे करीत आहेत. प्रसंगी निरीक्षक वाकोडे यांनी समजूत घालत तपासासाठी आम्ही त्यांना आणत असून आमचे समाधान झाल्यावर सोडून सुध्दा देत आहोत जोपर्यंत उटखेडा गावातून सहकार्य होत नाही तोपर्यंत आरोपी आम्हाला कसा मिळेल ? यासाठी कृपया आपण निश्चिंत असावे, जरी तुमचे मुले शिक्षण घेत असलीतरी कृपया पोलिसांची बाजू आपण सर्वांनी समजून घेऊन सहकार्य करण्याचे अवाहन पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी उटखेडा येथील महिलांना केले. यावेळी महिला देखिल समजूतीची भूमिका घेऊन पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.



सायबर तज्ज्ञांनी जाणून घेतली माहिती
उटखेडा गावातील गुन्ह्याच्या तपासासाठी सायबर सेल शाखा, स्थानिक गुन्हे शाखेचे नरेंद्र वारुळे आपल्या पथकासह रावेर व उटखेडा येथे येऊन गेले.
त्यांनी विविध टॉवरांचे लोकेशन व सायबर संदर्भात माहिती गोळा केली. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
