भडगाव तालुक्यातील वाळू माफिया एक वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार


The sand mafia of Bhadgaon was expelled by Pachora provincial authorities जळगाव : भडगाव तालुक्यातील वाळू माफियाला एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत पाचोरा येथील प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल यांनी आदेश काढल्याने वाळू माफियांच्या गोटात खळबळ उडाली आहे. संजय त्रिभूवन असे हद्दपार झालेल्याचे नाव असून त्याचा वाळू तस्करीसह अनेक गैरकृत्यांमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विविध गुन्ह्यात सहभाग
त्रिभूवन हा भडगाव तालुक्यातील वाकचा रहिवासी असून वाळू चोरीच्या गुन्ह्यात वारंवार सहभाग, वाळूचोरी रोखणार्‍या पथकावर हल्ला, मारहाण, शिविगाळ करत ठार मारण्याची धमकी देणे आदी गुन्ह्यांमध्ये त्याचा स्रयि सहभाग असल्याच्या कारणावरून उपविभागीय अधिकार्‍यांनी ही कारवाई केली आहे. संजय त्रिभुवन याची दादागिरी इतकी वाढली होती की, त्याने दोन वर्षापूर्वी गस्तीवरील तलाठी एन.के.पारधी, व्ही.पी.शिंदे यांच्यावर जिवघेणा हल्ला केला होता. यानंतर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने उपविभागीय अधिकार्‍यांकडे दिला होता. यानुसार ही कारवाई करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !