भुसावळात डीआरएम गुप्तांच्या हस्ते अत्याधूनिक इंजिनाचे उद्घाटन
भुसावळ : वातानुकूलित सुविधेसह सीसीटीव्ही व अन्य अत्याधूनिक सुविधांनी सज्ज रेल्वे इंजिनाचे (लोकोचे) उ्दघाटन डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी कारखाना प्रबंधक शिवराम उपस्थित होते. अद्यावत केलेल्या इंजिनाला (क्र.27103) फुलांनी सजविण्यात आले तर डीआरएम गुप्ता यांनी इंजिनात प्रत्यक्ष जावून बदलांचे निरीक्षण केले. यावेळी कारखाना प्रबंधक शिवराम यांनी गुप्ता यांना माहिती दिली. यावेळी वरीष्ठ मंडळ अभियंता पी.के.भंज, कारखाना उपप्रबंधक सारिका गर्ग, निखील सिंग, के.पी.सिंग, रामफळ यादव, आर.के.मालवीय यांच्यासह पीओएचमध्ील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
चालकांची कॅब केली मोठी
भुसावळातील रेल्वेच्या विद्युत इंजिन कारखान्यात अजनी येथील लोको पीओएच करण्यासाठी आल्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आला. यात इंजीनात वातानुकूलीत यंत्रणा (एसी) बसविण्यात आला. दोन्ही कॅबमध्ये ही व्यवस्था करण्यात आली तसेच दोन्ही कॅबमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून चालकांची कॅब मोठी करण्यात आली. इंजिनाला रंगरंगोटी करून नवीन करण्यात आले. इंजजिनाची सर्व वायरींग नवीन करण्यात आली. दरम्यान, डीआरएम गुप्ता यांनी पाहाणी करून कर्मचार्यांनी रेल्वे इंजीनात केलेल्या आमुलाग्र बदलामुळे समाधान व्यक्त करीत पीओएच कारखान्याला 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

