जळगाव रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणीत सव्वा लाखांचा दंड वसुल
भुसावळ : विना तिकीट प्रवास करणार्या प्रवाशांविरुद्ध धडक कारवाई मोहिमेंतर्गत जळगाव रेल्वे स्थानकावर शुक्रवारी मोहिम राबवण्यात आली. वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबधंक आर.के.शर्मा व सहाय्यक वाणिज्य प्रबधंक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या मोहिमेत 16 तिकीट तपासणीसांनी 233 केसेसच्या माध्यमातून एक लाख 23 हजार 840 रुपयांचा दंड वसुल केला. त्यात जनरल तिकीटावरून स्लीपर डब्यात प्रवास करणार्या 270 प्रवाशांकडून एक लाख 50 हजार 830 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. विना तिकीट प्रवास करणार्या 37 प्रवाशांकडून 26 हजार 990 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. या मोहिमेत मुख्य तपासणी तिकीट निरीक्षक वाय.डी.पाठक यांच्यासह विविध तपासणी पथकातील कर्मचारी उपस्थित होते.
