जावळे येथे आज परदेशी राजपुत समाज उन्नती मंडळाची वार्षीक सभा


चाळीसगाव : परदेशी राजपुत समाज उन्नती मंडळ या संस्थेची वार्षीक आमसभा जावळे येथे दि. ७ रोजी रविवारी संस्थेचे अध्यक्ष भरतसिंग देवचंद छानवाल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. ही सभा चाळीसगाव ता. जावळे येथील भगवान चञु परदेशी व गोरख चञु परदेशी यांनी जावळे शिवार येथील गट नं. ८४/१, ८५/१, ८६/१ मधील एकुण क्षेञ ५६ आर संस्थेस दान स्वरुपात दिलेली आहे. या शेतात ही सभा होणार आहे. या सभेत भगवान चञु परदेशी व गोरख चञु परदेशी या दोघा भावांचा संस्थेस जमीन दान दिल्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहे. तसेच समाजातील गुणवान, हुषार विदयार्थ्यांचा व मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. इयत्ता दहावी व इयत्ता बारावी , स्पर्धा परीक्षा व शासकीय परीक्षांमध्ये ८० टक्कयांपेक्षा ज्यादा गुण मिळाले असतील. त्यांनी गुणांची सत्यप्रत डाॅ. कर्तारसिंग सरदारसिंग परदेशी लक्ष्मीनगर चाळीसगाव फोन नं. २५८९. २२२६२२ या पत्त्यावर दि. ५/८/२०२२ च्या आत पाठवावीत.असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. तसेच आमसभेस सभासद व समाजबांधवांनी उपस्थित राहावे. असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष भरतसिंग देवचंद छानवाळ, कार्याध्यक्ष डाॅ. कर्तारसिंग सरदारसिंग परदेशी, उपाध्यक्ष देवचंद दलीचंद परदेशी, खजिनदार सतिष रघुनाथ परदेशी, संचालक हिरालाल पुनमचंद परदेशी, संचालक सुरेश अमरसिंग परदेशी, संचालक डाॅ. जयसिंग शामसिंग परदेशी, संचालक सुभाष मन्नुसिंग महाजन, संचालिका डाॅ. सुशिला कर्तारसिंग परदेशी, सचिव निलेश जयसिंग राजपुत आदि संचालक मंडळामार्फत करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !