‘हर घर झेंडा’ उपक्रमांतर्गत जळगावात एसीबीतर्फे सायकल रॅली
Cycle rally organized by ACB in Jalgaon under ‘Har Ghar Zenda’ initiative जळगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जळगाव लाचलुचपत विभागाच्या वतीने ‘हर घर झेंडा’ या उपक्रमांतर्गत जनजागृतीसाठी रविवारी 7 ऑगस्ट रोजी सकाळी श्रसज्ञ वाजता काव्यरत्नावली चौक ते मेहरूण तलाव दरम्यान सायकल रॅली काढण्यात आली.
रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष होत असल्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव युनिटतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 13 ऑगष्ट 2022 ते 15 ऑगष्ट 2022 या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार हर घर झेंडा हा उपक्रम राबविणेबाबत व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यप्रणाली व भ्रष्टाचाराचे निर्मूलन याची जनजागृती करण्यासाठी रविवारी 7 ऑगस्ट रोजी रोजी सकाळी 6 वाजता भाऊंचे उद्यान, काव्यरत्नावली चौक ते मेहरूण तलावपर्यंत सायकल रॅली काढण्यात आली.

भ्रष्टाचार विरोधात पोलिस उपअधीक्षकांनी केले मार्गदर्शन
सायकल रॅली संपल्यानंतर तलावाजवळ लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याबद्दल व भ्रष्टाचार विरोधात जनजागृती करावी यासंदर्भात पोलीस उपधिक्षक शशिकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. आयोजित रॅलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, निरीक्षक एन.एन.जाधव यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
