भुसावळातील भंगार व्यावसायीकाचा डेंग्यूने मृत्यू


भुसावळ :शहरातील आठवडे बाजार भागातील पंचशील नगरातील मच्छी मार्केट मागील एका तरुण भंगार व्यावसायीकाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याची घटना 1 रोजी घडली. परवेज अहमद शेख पिंजारी उर्फ बाबा (22, पंचशील नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. सुमारे चार दिवसांपुर्वी डेंग्युची लागण झाल्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यास मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मुंबई येथे उपचारादरम्यान त्याचा रविवार, 1 डिसेंबर रोजी सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला.

पालिका प्रशासनाविषयी वाढला रोष
लागोपाठ शहरात डेंग्यूमुळे अनेकांचे मृत्यू होत असल्याने भुसावळ शहरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नगरपरीषद प्रशासन व सत्ताधार्‍याविरुद्ध रोष व्यक्त होत आहे. शहरात अस्वच्छतेमुळे मोठ्या प्रमाणात डेंग्यूची लागण लागली असून अनेक नागरीक डेंग्यूने त्रस्त आहेत. मयत अविवाहित तरुणाच्या पश्चात आई, भाऊ, बहिण असा परीवार आहे. सोमवारी दुपारी 4 वाजेदरम्यान त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले तर मंगळवारी सकाळी मृतदेह भुसावळ येथे आल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !