11 महिन्यांच्या चिमुकल्याचा विचीत्र अपघातात पाचोर्यानजीक मृत्यू
महिंद्रा पिकअप वाहनाची टाटा मेक्सीमो वाहनाला धडक : नऊ प्रवासी जखमी
Toddler killed in two-vehicle collision near Khedgaon : Nine passengers injured पाचोरा : रक्षा बंधनासाठी माहेरी निघालेली विवाहिता 11 महिन्यांच्या चिमुकल्याला घेवून जात असताना खेडगाव नंदीचे गावाजवळ झालेल्या अपघातात चिमुकल्याचा मृत्यू ओढवला तर वाहनातील 9 प्रवासी जखमी झाले. बुधवार, 10 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
पिकअपने उडवल्याने अपघात
प्रवासी वाहतूक करणारी खाजगी टाटा मेक्सिमो (क्रमांक एम.एच.15 ई.एक्स.1832) मध्ये शिरसोली येथून विवाहिता अनिता भगवान सोनवणे या 11 महिन्यांचा चिमुकला गणेशसोबत माहेरी निघाल्या होत्या मात्र दुपारी दोन वाजेच्या सुमारास खेडगाव (नंदीचे) जवळ पाचोर्याहुन भरधाव वेगाने जाणारी मालवाहू महिंद्रा पिकअप (क्रमांक एम.एच. 19 सी.वाय.9223) ने मेक्सिमोला जोरधार धडक दिली. या धडकेत प्रवाशांनी भरलेली मेक्सिमो ही रस्त्याच्या खाली जावुन पलटी झाली. या अपघातात गणेश भगवान सोनवणे या 11 महिन्याच्या चिमुकल्यांचा वाहनाखाली दबुन जागीच मृत्यू झाला.

हे प्रवासी जखमी
या अपघातात चालक भैय्या कोळी (रा.खेडगाव नंदीचे, ता.पाचोरा), अनिता पवन चव्हाण (38, रा.कोकडी तांडा, ता.पाचोरा), सुशिलाबाई धनराज राठोड (38, रा.रामदेववाडी, ता.जळगाव), विकास सुरेश पवार (27, रामदेववाडी, ता.जळगाव), आदित्य विकास पवार (7, रामदेववाडी, ता.जळगाव), अनिता भगवान सोनवणे (22, रा.दापोरा, शिरसोली), लता गोकुळ राठोड (37, रा. रामदेववाडी, ता.जळगाव), ऋषीकेश प्रदीप पंडित (16, लासगाव, ता.पाचोरा) व निकीता गोकुळ राठोड (14, रामदेववाडी, ता.जळगाव) हे 9 जण जखमी झाले.
अनेकांची अपघातस्थळी धाव
अपघाताची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र वल्टे, समीर पाटील, संदीप भोई व योगेश पाटील हे तत्काळ हजर होवुन अपघातग्रस्तांना मदत करत त्यांना रुग्णालयात हलवून वाहतूक सुरळीत केली. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असुन महिंद्रा पिकअप चालकास पाचोरा पोलिसांना ताब्यात घेतले आहे.
