Three criminals in Sarai in Jalgaon exiled for two years अट्टल गुन्हेगार चले जाव : दोन वर्षांसाठी त्रिकूटाची हद्दपारी


Three criminals in Sarai in Jalgaon exiled for two years जळगाव : विविध गंभीर गुन्ह्यातील तीन संशयितांना दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काढले आहेत. पिन्या रोहिदास चव्हाण (23), सोनूसिंग ऊर्फ सोन्या रमेश राठोड (23) व उमेश ऊर्फ साई सोनाजी आठे (27, तिन्ही रा.सुप्रिम कॉलनी) अशी हद्दपार संशयीतांची नावे आहेत.

वारंवार गुन्ह्यांचा आरोप
पिन्या रोहिदास चव्हाण, सोनूसिंग उर्फ सोन्या रमेश राठोड व उमेश उर्फ साई सोनाजी आठे हे तीनही संशयित एमआयडीसी परिसरात वारंवार चोरी, घर फोडी, मारामारीसारखे गंभीर गुन्हे करत असल्याने त्यांना हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी बुधवारी तिघांना दोन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले.

असे आहेत गुन्हे
दिनकर चव्हाण यांच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशन, जामनेर पोलीस स्टेशन, नशिराबाद पोलीस स्टेशन अशा विविध पोलीस ठाण्यात 19 चोरी, घरफोडी, जबरी लूट असे गुन्हे दाखल आहेत तर सोनूसिंग राठोड यांच्यावर चोरी, घरफोडी व शस्त्र अधीनियमांतर्गत एकूण 7 गुन्हे तर उमेश सोनाजी आठे याच्यावर चोरी घरफोडीचे एकूण सात गुन्हे दाखल आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !