स्कुटर कंपनीचा प्रतिनिधी भासवत एकास 25 हजार रुपयात गंडविले


A youth from Pachora was extorted 25,000 by pretending to be a representative of a scooter company पाचोरा : बुक केलेल्या स्कुटरचे अ‍ॅडव्हास मागत पाचोर्‍यातील एकास 25 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला. अज्ञात व्यक्तीविरुद्ध पाचोरा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.

पाचोरा पोलिसात गुन्हा
शहरातील संभाजी नगरातील रहिवासी श्रीकांतगीर कैलासगीर गोसावी (32) यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर ओला इलेक्ट्रीक मोबॅलिटी प्रा.लि. या कंपनीचा लोगो असलेली एक लिंक पाठविण्यात आली. श्रीकांतगीर गोसावी यांनी सदरची लिंक ओपन करुन त्यात इलेक्ट्रीक स्कुटर बुक केली. दरम्यान श्रीकांतगीर गोसावी यांना 9733086638 या मोबाईल क्रमांकावरुन फोन आला असता समोरच्या व्यक्तीने मी कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगुन तुमची स्कुटर बुक झाली आहे. तुम्ही माझ्या या मोबाईल क्रमांकावर गुगल पे द्वारे 25 हजार रुपये पाठवा. श्रीकांतगीर गोसावी यांनी क्षणाचाही विचार न करता 25 हजार रुपये पाठविले. काही वेळाने श्रीकांतगीर गोसावी यांना पुन्हा फोन आल्यावर समोरच्या व्यक्तीने पुन्हा 14 हजार 900 रुपये पाठविण्यास सांगितले. मात्र यावेळी श्रीकांतगीर गोसावी यांना संशय आला व त्यांनी पाठवतो म्हणून सांगितले.

अखेर पोलिसात तक्रार
श्रीकांतगीर गोसावी यांनी शहानिशा करण्यासाठी कंपनीच्या कस्टमर केअर नंबरवर फोन करुन चौकशी केली असता कंपनीला 25 हजार रुपये मिळाले नसल्याचे सांगितल्यावर श्रीकांतगीर गोसावी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पाचोरा पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक मंगलसिंग गायकवाड हे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !