पंकजा मुंडेंप्रमाणे अॅड.रोहिणी खडसेंनाही भाजपाच्या लोकांनीच पाडले
माजी मंत्री एकनाथराव खडसेंचा गौप्यस्फोट : प्रदेशाध्यक्षांकडे नाव देवूनही दखल नाही
जळगाव : पंकजा मुंडेसह अॅड.रोहिणी खडसे यांचाही पराभव भाजपाच्या काही लोकांकडून करण्यात आला, या संदर्भातील नावे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिल्यानंतर साधी चौकशीदेखील झालेली नाही, असा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे केला. जळगाव येथील ‘मुक्ताई’ बंगल्यावर खडसे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.
कटकारस्थान करीत पाडले
खडसे म्हणाले की, पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला नसून पक्षांतर्गतच कटकारस्थान करून त्यांना पाडण्यात आले. त्यांच्या विरोधातील उमेदवार धनंजय मुंडे यांना मदत पुरविली गेली, असे त्यांच्या कार्यकर्त्यांचे मत आहे. अॅड. रोहिणी खडसे यांच्याबाबत तर उघडपणे भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी विरोधात काम केले. त्यांची नावे मला स्वत:लाच माहिती आहेत. ही नावे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कळविली मात्र अजूनही पक्षाने त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. कारवाईची आप वाट पाहत आहोत, असेही ते म्हणाले.


