Amalner taluka shaken: younger brother’s wife raped by elder अमळनेर तालुका हादरला : लहान भावाच्या पत्नीवर जेठाने केला बलात्कार


Amalner taluka shaken: younger brother’s wife raped by elder अमळनेर : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये जिल्ह्यात सातत्याने वाढ होत आहे. अमळनेर तालुक्यातील एका गावात सख्ख्या लहान भावाच्या पत्नीवर जेठाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
पीडीत 26 वर्षीय विवाहितेच्या फिर्यादीनुसार, सुमारे सात महिन्यांपूर्वी तसेच 5 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी साडेसात वाजता आरेापी तसेच नात्याने जेठ असलेल्या गोपाल खंडू भोई याने मुलाला मारून टाकण्याची धमकी देत अत्याचार केला. यामुळे विवाहिता गरोदर राहिली तर या प्रकारानंतर सासु, सासरे खंडू भिमा भोई जेठाणी यांनी पीडीतेच्या पोटावर हाताबुक्यांनी मारहाण करीत शिविगाळ देखील केली. या प्रकरणी पीडीतेने धुळे शहर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा शून्य क्रमांकाने मारवड पोलिसात वर्ग करण्यात आला. आरोपी गोपाल खंडू भोई, मनिषा गोपाल भोई, कलाबाई खंडू भोई, खंडू भीमा भोई (सर्व रा.अमळनेर तालुका) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहेत. दरम्यान, पीडितेला आधार नसल्यामुळे तिला जळगावच्या आशादीप महिला संरक्षण केंद्रात ठेवण्यात आले. संशयीत आरोपी जेठ गोपाल भोई याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !