विषारी औषध देवून मारण्याचा प्रयत्न : मारवड पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा
अमळनेर : अमळनेर तालुक्यातील खेडी ते गोवर्धन रस्त्यावर एकाला रस्ता अडवून जुन्या भांडणाच्या कारणावरून बेदम मारहाण करून विषारी औषध घेऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संदर्भात मारवड पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
चार जणांवर गुन्हा दाखल
याबाबत अधिक माहिती अशी की, योगेंद्र शिवाजी उदागे (२८, रा.पाथर्डी जि. अहमदनगर ह.मु. मांडळ ता. अमळनेर) हा आपल्या कुटुंबियांचे वास्तव्याला आहे. दरम्यान जेसीबीचे काम करून ती आपला उदरनिर्वाह करतो. ६ ऑगस्ट रोजी जुन्या भांडणाच्या कारणावरून रमेश रामचंद्र धनगर, दिपक दगडू धनगर, दगडू रामचंद्र धनगर सर्व रा. मांडळ ता. अमळनेर आणि किशोर धनगर (रा. फागणे ता.जि. धुळे) यांनी मिळून खेडीपासून ते गोवर्धन रस्त्यावर योगेंद्र याचा रस्ता अडविला. दरम्यान जुन्या भांडण कारणावरुन त्याला मारहाण करून विषारी औषध पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात योगेंद्र उदागे यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे करीत आहे.

