भुसावळ डीआरएम कार्यालयातर्फे दिव्यांग दिनानिमित्त दुचाकीचे वाटप


भुसावळ : राष्ट्रीय दिव्यांग दिनाचे औचित्य साधून भुसावळ डीआरएम कार्यालयात डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या हस्ते तीन दिव्यांग व्यक्तींना दुचाकीचे वाटप करण्यात आले. प्रसंगी सीआरएमएस अध्यक्ष व्ही.के.समाधीया, एसबीएफ कमिटी सदस्य जी.जी.ढोले, रेल्वे स्कूल शिक्षक मनोज साळुंख, मुख्य कार्यालय अधीक्षक दिलीप पाटील, सीएमएस पी.के.सामांतराय, एडीआरएम मनोजकुमार सिन्हा डीआरएम विवेककुमार गुप्त्ा यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी तीन दिव्यांग कर्मचारी प्रमोद कुमार, प्रकाश इंगळे आणि शेख अफजल शेख सिकंदर यांना डीआरएम यांच्या हस्ते दुचाकी वाहनांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेल्वे स्कूलचे सतीश कुलकर्णी यांनी तर आभार एपीओ आर.एच.परदेशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सिनी.डीपीओ एन.डी.गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्मिक शाखेच्या सर्व कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !