भुसावळच्या मुख्याधिकारी करुणा डहाळेंवर शिस्तभंगाची कारवाई हवी


भुसावळ वर्कर्स युनियनची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार : विकासकामे खोळंबली

भुसावळ :  पालिकेच्या विद्यमान मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी पदभार स्विकारल्यापासून शहराचे विकासकामे, नागरीकांची तसेच कर्मचार्‍यांच्या हिताचे निर्णयावर संबंधीत विभागाच्या लिपिकाव्दारे स्वयंस्पष्ट अहवाल देवूनही कामे होत नाहीत. यामुळे मुख्याधिकारी डहाळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी नगरपालिका वर्कर्स युनियनने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. यामुळे मुख्याधिकारी डहाळे यांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

नियमानुसार कामांनाही मंजुरी देण्यास टाळाटाळ
नगरपालिका वर्कर्स फेडरेशनने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ पालिकेच्या विद्यमान मुख्याधिकारी यांनी पदभार स्विकारल्यापासून शहरातील विकास कामांत, नागरिकांच्या दैनंदिन कामांच्या तसेच कर्मचार्‍यांच्या हिताच्या निर्णयावर संबंधीत विभागातील लिपिकाव्दारे स्वयंस्पष्ट अहवाल देवूनही कोणत्याही विभागातील कामे नियमांनुसार असतानाही सुध्दा करण्यात टाळाटाळ केली जाते. जे काम कायद्यानुसार असूनही मंजूरी देत नाही. यामुळे लोकप्रतिनिधी व नागरिकांचा रोष संबंधीत अधिकारी व कर्मचार्‍यांना सहन करावा लागतो. यामुळे कर्मचार्‍यांना शारिरिक व मानसिक ताण सहन करावा लागत आहे. यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या अधिकारांचा वापर करुन मुख्याधिकार्‍यांना समज द्यावी. तसेच अनुसूचित जातीतील मागासवर्गीय सफाई कामगारांच्या सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती किंवा वैद्यकिय रित्या रिक्त झालेल्या पदावर शासनाने दिलेल्या आदेशानुसार लाड समितीच्या शिफारसीनुसार 30 दिवसांच्या आत त्यांच्या वारसांची नेमणूक देण्याचे आदेश असतानाही आदेशाची अवहेलना होत आहे. मागासवर्गीय सफाई कर्मचार्‍यांचे आर्थिक शोषण केले जात आहे. म्हणून मुख्याधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी अध्यक्ष राजू खरारे, सरचिटणीस दिनेश आहिरे, धनराज बाविस्कर, दादासाहेब सावंत आदींसह तब्बल शंभरावर पालिका कर्मचार्‍यांनी केली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !