पशुखाद्याच्या नावाखाली दारूची बेकायदा वाहतूक : पाच लाखांच्या दारूसह चालक जाळ्यात
Illegal transportation of liquor in the name of animal feed: Driver caught with liquor worth five lakhs खामगाव : पशुखाद्याच्या आड लाखो रुपयांची दारूची चोरटी वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला असून चालकाला अटक केली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पशुखाद्याच्या आड दारू घेऊन जाणारा ट्रक मोठ्या शिताफिने पाठलाग करून टेंभुर्णा नजीक पकडण्यात आला आहे. या ट्रकमध्ये पाच लाख रुपये किंमतीचे दारूचे तब्बल 800 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून. ट्रकसह दारू साठा जमा करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातून एक ट्रक मोठ्या प्रमाणावर दारू घेऊन नागपूरकडे जात असल्याची गुप्त माहिती मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. यावरून मुंबई भरारी पथकाने बुलढाणा व खामगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या सोबत घेऊन संयुक्त पथक तयार केले. या पथकाने मध्यरात्री दोन वाजेदरम्यान पाठलाग करून ट्रक (क्रमांक सी.जी.07 ए.व्ही. 4476) ला टेंभुर्णा नदी पकडले.

पशूखाद्याआड दारुची वाहतूक
यावेळी ट्रकची झाडावरती घेतली असता मागे गेटवर काही कट्टे पशुखाद्य होते तर त्यामागे दारूचे बॉक्स लपवण्यात आले होते. यावेळी हा ट्रक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात आणण्यात आला. ट्रकच्या तपासणीत तब्बल 800 बॉक्स दारू मिळून आली. या प्रकरणी ट्रक चालक मोहम्मद हनीफ (58) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वैध दारू विक्रीचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.
