भुसावळात जुगाराचा डाव उधळला : दोघे जाळ्यात
भुसावळ : शहरातील आठवडे बाजारात टपरीच्या आडोशाला कल्याण मटका जुगाराचा डाव सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करीत दोघांना अटक केली. बुधवार, 4 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यात आरोपी मनोहर गोविंदा साळुंखे (53, रा.गंगाराम प्लॉट, भुसावळ) व शेख नईम शेख गफुर (45, रा.काझी प्लॉट, भुसावळ ) यांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून चार हजार 580 रुपये रोख व सट्टा-जुगाराची साधने जप्त करण्यात आली. ही कारवाई उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय भदाणे, नाईक रवींद्र बिर्हाडे कॉन्स्टेबल विकास सातदिवे, उमाकांत पाटील, कृष्णा देशमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने केली.
