Biodiesel worth 17 lakhs seized in Dhule : Two Arrested धुळ्यात 17 लाखांचे बायोडिझेल जप्त : दोघांना अटक


Biodiesel worth 17 lakhs seized in Dhule : Two Arrested धुळे : अवैधरीत्या बायोडिझेलची होणारी वाहतूक धुळे तालुका पोलिसांनी अजंग शिवारात रोखत 17 लाखांचे बॉयोडिझेल जप्त केले. गुरुवारी ायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई झाली. या प्रकरणी चालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले असून चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
नागपूर-सुरत महामार्गाने धुळे तालुका हद्दीतून (जी.जे.21 टी.5943) क्रमांकाच्या टँकरमधून राज्यात साठवणूक करणे व वाहतूकीसाठी बंदी असलेल्या बॉयोडिझेलची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांना मिळाली.त्यानुसार त्यांच्यासह तालुका पोलिस ठाण्याचे पीआय दत्तात्रय शिंदे यांनी पथकासह काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अजंग शिवारात शोध घेत संशयीत टँकरला पकडले. हॉटेल एकता समोर हे टँकर मिळून आले. त्यात बायोडिझेलचा साठा आढळून आल्याने ट्रक चालक सुरजीतसिंह चुनीलाल वसावा (27, रा.अमियार, ता.साबुतारा, गुजरात) व साहिल अब्दुल कादर हाफिजजी (22, रा.रामपुरा चौक, सुरत) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तसेच दहा लाखांचा टँकर व 7 लाख 19 हजार 600 रूपये किंमतीचे बायोडिझेल असा एकुण 17 लाख 19 हजार 600 रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. असलम भाई याच्या सांगण्यावरून बायोडिझेलची वाहतूक करीत असल्याची कबुली दोघांनी दिली. या प्रकरणी मुकेश पवार यांच्या फिर्यादीवरून वरील तिघांसह ट्रेडर्स मलकापूर (जि.बुलढाणा) मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. आहे. पीआय दत्तात्रय शिंदे पुढील तपास करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जे.शेखर पाटील, पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटी., अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस उप निरीक्षक सागर काळे, पंजाबराव साळुंके, प्रवीण पाटील, किशोर खैरनार, मुकेश पवार आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !