मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला करण्याची पाकमधून धमकी !


मुंबई : पाकिस्तातनच्या कुरापती कायम असून मुंबई शहरात पुन्हा 26/11 सारखाच हल्ला पुन्हा करण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
ट्राफिक पोलिसांच्या कंट्रोल रुममधील व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर धमकीचा मेसेज आला असून या मेसेजमध्ये सहा दहशतवादी भारतात पोहोचल्याचा दावा केला गेला आहे तसेच लवकरच मुंबईत 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी यात देण्यात आली. या मेसेजनंतर एकच खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला.

मेसेजद्वारे दिली धमकी
मुंबईमध्ये हल्ला होणार आहे. मुंबईमध्ये हल्ला करण्याची तयारी करत आहे. मी पाकिस्तानमधून आहे. तुमचे काही भारतीय मुंबईला उडवण्यात माझी साथ देत आहेत. मुंबईला उडवण्याची पूर्ण तयारी झाली आहे, आता काहीच वेळ शिल्लक आहे. कधीही हल्ला करू शकतो. 26/11 चा हल्ला लक्षात असेलच. नसेल तर आता पुन्हा एकदा पाहा. ही फक्त धमकी नाही, तर प्रत्यक्षात येतोय. माझं लोकेशन पाकिस्तानमध्ये दिसेल पण काम मुंबईत चालेल. आमचा काही ठिकाणा नसतो. लोकेशन तुम्हाला दुसर्‍याच देशाचं दिसेल, असे या धमकीच्या संदेशात नमूद आहे.


कॉपी करू नका.