नाते कधीही तुटू नये, ही निर्मळ भावना जपणारे प्रा.धीरज पाटील
भुसावळ : साधारणपणे प्रामाणिकपणा, कष्टाळू, निःस्वार्थ मदत करण्याची वृत्ती, चटपटीतपणा, सात्त्विक स्वभाव आणि सर्व लोकांमध्ये मिळून-मिसळून राहण्याचे कौशल्य या सर्व गुणांमुळे एखादा व्यक्ती सर्वांची लोकप्रियता मिळवतो अन् याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तमाम जनतेला सुपरिचित असणारे भुसावळ शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज गणेश पाटील.
समाजासाठी सतत कार्यरत असणारं हरहुन्नरी नेतृत्व
प्रा.धीरज गणेश पाटील हे मूळचे भुसावळचेच. शिक्षण एम. ई इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकॉम. 13 वर्ष भुसावळच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले. आई- वडील साधारण शेतकरी कुटुंबातील. वडिलांना भुसावळ नगरपालिकेतील 40 वर्षाचा कामकाजाचा अनुभव. कुठलाही राजकीय वारसा नसताना एका सर्वसामान्य कुटुंबातील अद्वितीय व सतत सामाजिक बांधिलकी जपणारं साधं, सरळ व लोकप्रिय नेतृत्व. सामाजिक व राजकीय क्षेत्रात उत्तम कार्य करत तन्मयतेने भुसावळवासीयांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, सोबतीला विविध विकासकामांतून फक्त स्वतःच्या प्रभागापुरता मर्यादित न राहता कुठलाही गरजवंत असेना, त्याला शक्य तितकी मदत करण्याचं कार्य गेल्या कित्येक दिवसांपासून प्रा. पाटील यांनी केलं आहे. समाजासाठी सतत कार्यरत असणारं हरहुन्नरी नेतृत्व आज भुसावळ तालुक्याच्या राजकीय पटलावर सरांच्या रूपात वावरताना दिसतंय.
विलक्षण नम्रता सर्वांनाच भावणारी
वार्याचा गुणधर्म वाहणं आहे; पण त्या वार्यात फक्त चांगल्या कामाच्या सुगंधाने, किर्तीचा दरवळ आजूबाजूला निरंतर पसरावा, असे हे नेतृत्व. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणे, आरोग्य विषयक जनजागृती करणे, नागरिकांच्या अवाजवी वीज देयकांचा प्रश्न असेल किंवा रुग्णांची शस्त्रक्रिया करणे असेल, रेशनकार्ड संबंधी समस्यांचे निराकरण करणे अशी असंख्य कामे करत असतानाच सोबत सामाजिक अस्मिता जपत, कार्यरत असणार्या धिरज सरांच्या स्वभावाची चर्चा नेहमी होते. प्रत्येकाला दुसर्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा असू शकतात. काही जणांना प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, कष्टाळूपणा, वरवरचे दिसणे, वागणे-बोलणे, चांगले असणे आवडते. प्रत्येकाचा प्राधान्यक्रम वेगवेगळा असल्याने एकच-एक गुणामुळे आपण लोकांच्या पसंतीस उतरू शकू, अशी शक्यता नसते. वेगवेगळ्या गुणांचा आपल्या वागण्यात समुच्चय असला पाहिजे, तर आपण जास्तीत जास्त लोकांच्या पसंतीस उतरू शकतो. कारण प्रत्येकाला आवडणारा एखादा तरी गुणधर्म आपल्यामध्ये त्यांना दिसू शकतो आणि त्यामुळेच त्यांना आपण आवडू शकतो. या सर्व बाबींचा विचार केला, तर धीरज सर यांच्यात असलेली विलक्षण नम्रता सर्वांनाच भावणारी व आपलंस करणारी आहे.
म्हणूनच ते वाटतात ‘ऊर्जेचा स्रोत’
13 जुलै 2021 त्यांच्या आयुष्यात एक वेगळं वळण घेऊन आला. अफाट मेहनत करणारे धीरज सर यांची नोकरी गेली पण त्यांनी समाजकार्यात जरा देखील कमी पडू दिली नाही. सदोदित सकारात्मक विचार बाळगणे, हे त्यांच्या यशाचे गमक आहे. खचलेला व निराशेने ग्रासलेला व्यक्ती काही काळ त्यांच्या सहवासात रमला तर निराशा झटकून ध्येयाकडे वाटचाल कशी करावी, हे निव्वळ त्यांच्या दैनंदिन कार्यप्रणालीतून शिकून जाईल, इतकी ऊर्जा त्यांच्यात आहे. ध्येयप्राप्तीकडे जाताना कितीही अडथळे आले तरी ध्येयप्राप्ती होईपर्यंत मागे सरायचे नाही, अशी जिद्द आणि चिकाटी बाळगणारे धीरज सर अनेकांना ‘ऊर्जेचा स्रोत’ वाटतात. केवळ राजकारण हे त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट नाही, म्हणून ते कधीही राजकारणाला प्राधान्य देत नाही. समाजकार्य हा त्यांच्या अस्तित्वाचा मूळ गाभा आहे. आचरणशील वागणूक हे त्यांचे शस्त्र आहे. आचार-विचारांचे तगडे शस्त्र हाती घेऊन त्यांचा समाजात वावर राहिलेला आहे. सातत्याने समाजकार्य करणे, हे त्यांच्या राजकीय जीवनातील उद्दिष्टे आहे. कर्तव्याप्रती व शहराच्या विकासप्रती असलेला अपार जिव्हाळा जपणारे धिरज सर कर्तव्याला कधीच चुकत नाही. त्यामुळे बुद्धिजीवी नागरिकांचे ते आयकॉन बनले आहे. राजकारण करत असताना त्यांनी आपल्या गणगोतांवर अथवा मित्रपरिवारावर आपल्या बाजूने असण्याचा वा राजकारणात आपल्याला मदत करण्याचा कधीही आग्रह धरला नाही अथवा गणगोत, आप्तेष्ट वा मित्रांवर कधीही नाराज झाले नाहीत. कोणी कोणाबरोबर राहावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे; पण नाते कधीही तुटू नये, इतकी निर्मळ भावना जपणारे धीरज सर समाजकारण व राजकारण करत असताना माणूसपणही तितक्याच तन्मयतेने जपतात. हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सर्वच राजकीय पक्षाच्या, सामाजिक संघटनांच्या मित्र परीवाराने दिलेल्या शुभेच्छातुन दिसून आले आहे. मित्र पक्षा सोबत विरोधी पक्षातही त्यांची लोकप्रियता आज सिद्ध झाली आहे. आज शनिवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्यासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा !