सावखेडासीमला 30 वर्षीय विवाहितेचा विनयभंग


यावल (4 डिसेंबर 2024) : यावल तालुक्यातील सावखेडासीम येथे 30 वर्षीय विवाहितेच्या घरात जाऊन एका तरुणाने विवाहितेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. ही घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी मंगळवारी यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
सावखेडासीम गावात एक 30 वर्षीय विवाहिता सोमवारी रात्री आपल्या घरी असताना गावातीलच रहिवासी रवींद्र चावदस कोळी याने अनधिकृतरित्या घरात प्रवेश केला. महिलेचा हात पकडून तिच्याशी अंगलट करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. घडलेला प्रकार महिलेने तिच्या कुटुंबाला सांगितला व या प्रकरणी मंगळवारी यावल पोलीस ठाण्यात पीडीत 30 वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून रवींद्र कोळी याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.


कॉपी करू नका.